आरपीआयला विधानसभेच्या 12 जागा मिळाव्यात – रामदास आठवले

लोकसभा

लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत,

तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले आहे.

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १० ते १२ जागा आम्हाला मिळाव्यात,

Related News

अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण न होता

मराठ्यांना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा,

क्रिमिलेयरची मर्यादा ८ लाखांवरून १२ लाख रुपये करावी, असेही ते म्हणाले.

या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे,

राज्य संघटक परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,

बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, आयूब शेख, श्रीकांत कदम,

सतीश केदारी आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले की, लोकसभेत आमच्या पक्षाला दोन जागा मिळणे अपेक्षित होते;

पण तसे झाले नाही. तरीही नाराजी दूर ठेवून आम्ही कामाला लागलो.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरपीआयला एक विधान परिषद मिळावी,

अशी विनंती केली होती. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आमचा समावेश व्हावा.

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे.

आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, राज्यस्तरावर आणि जिल्हा, तालुकास्तरावर ज्या समित्या आहेत

तिथे आम्हाला संधी मिळावी. महामंडळांच्याही नियुक्त्या कराव्यात,

अशी आमची मागणी आहे.

विधानसभेत महायुतीला १७० ते २०० जागा मिळतील, असेही आठवले यांनी नमूद केले.

Read also: https://ajinkyabharat.com/mpsc-exam-will-be-held-again-on-25th-august/

Related News