सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काल घडली.
या घटनेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असून विविध संघटना
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले असून
विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एक्स
या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
तसेच, राज्यावर कर्जाचा बोजाही वाढत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या
आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन
बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले की, टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती
शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे नीचपणाचा कळस आहे.
प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० टक्के वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर
भरून २५ टक्के वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची,
असा नवा गोरखधंदा या सरकारने सुरू केला असून ५० हजार कोटी रुपयांच्या
दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणे गरजेचे असून त्यासाठी
राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी महायुती सरकारने त्वरित
दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत
अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/government-raises-questions-on-ladki-bahine-yojana/