रोहन निलखन यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

रोहन निलखन यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार

दिनांक 18.08.2025 रोजी अकोला जिल्ह्यात कावड व पालखी उत्सवाचे आयोजन केले होते मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.

सुरक्षेच्या दृस्तीकोनातून विशेष काळजी घेण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त गांधीग्राम ते अकोला दरम्यान  लावण्यात आला होता.

पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पूर्णा नदीला पूर आला होता . त्यामूळे श्री संत गाडगे बाबाआपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर यांना बोलावण्यात आले होते.

(दि.17 ) रोजी रात्री गांधीग्राम येथे कावड, पालखी उत्सवा दरम्यान गांधींग्राम येथे कावडधारी शिवभक्तांच्या संरक्षणासाठी श्री संत गाडगे बाबाआपात्कालीन शोध व

बचाव पथक पुर्णा नदिपात्रात सेवा देत असताना एक शिवभक्त रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान चुकुन बोट खालुन धारेत लागताच बचाव पथकातील सदस्य रोहन मुरालीधर निलखन

याने क्षणाचाही विलंब न करता बोट खाली गेलेल्या शिवभक्ताला उडी घेऊन खालुन बाहेर ओढले व शिवभक्ताचे प्राण वाचविले, दाखविलेल्या धाडसा बाबत, सहाशी कृत्याची दखल

पोलीस अधीक्षकांनी घेऊन आज दिनांक (दि .१९ )  रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पथक प्रमुख  दीपक सदाफळे व रोहन निलखन यांची आई- वडील समवेत प्रशस्ती पत्र व

सन्मान चिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. सदरच्या पथकामध्ये विकास सदानशिव, निलेश खंडारे, निखिल बोबडे, रोहन निलखन, रुषी राखोंडे, विकी गाडगे श्याम घोंगे, प्रतीक

बोरसे, आकाश बागडे, शेखर केवट, विष्णु केवत, अंकुश सदाफळे, नितीन कोलटक्के, मनीष बुटे, पद्माकर अधिक, पंकज श्रीनाथ, योगेश श्रीनाथ, पवनधारपवार, तुळशीदास फुकट,

श्याम ठाकूर यांचा समावेश होता.

Read also : https://ajinkyabharat.com/epfo-bharatiisathi-ajachi-last-date-vadhavali/