रियादमध्ये पुढच्या पाच वर्षांपर्यंत भाडे स्थिर राहणार

सौदी अरेबियाने भारतीयांना दिलासा

रियाद : ज्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या विरोधात एकापाठोपाठ निर्णय घेऊन आर्थिक झटका देत आहेत, त्याचवेळी सौदी अरेबियाने भारतीयांसाठी दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे.अमेरिकेने मागच्या महिन्यात भारतीय सामनाच्या आयातीवर 50 टक्के टॅरिफ लावला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी औषध उत्पादनांच्या आयातीवर 100 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली, ज्याचा थेट परिणाम भारतीय औषध कंपन्यांवर होणार आहे.त्याचवेळी, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी राजधानी रियादमध्ये प्रॉपर्टी-भाडे नियम लागू केले आहेत. यानुसार पुढील पाच वर्षांसाठी निवासी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या भाड्याचे दर स्थिर राहणार आहेत. या निर्णयाचा उद्देश रियादमध्ये निष्पक्ष आणि पारदर्शक प्रॉपर्टी मार्केट सुनिश्चित करणे आणि भाड्याच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवणे हा आहे.या नवीन कायद्याचा फायदा मुख्यतः स्थलांतरित कामगारांनाही होणार आहे. सौदी अरेबियात सुमारे 25 लाखांहून अधिक भारतीय राहतात, त्यापैकी बहुतांश लोक भाड्याच्या घरात राहतात आणि भाड्याच्या जागेत व्यवसाय करतात. त्यामुळे या निर्णयामुळे भारतीय नागरिकांचे भाड्याचे ओझे कमी होईल आणि आर्थिक स्थिरता मिळेल.यामध्ये भाडे नियंत्रणासह रिनिव्हल प्रक्रिया आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन यांचा समावेश करण्यात आला आहे. हा कायदा 25 सप्टेंबर 2025 पासून लागू झाला असून, रियादमधील रूम मालक पुढील पाच वर्षांपर्यंत भाडे वाढवू शकणार नाहीत.भारत आणि सौदी अरेबियाचे ऐतिहासिक संबंध आहेत. दरवर्षी हजारो भारतीय नोकरी आणि व्यवसायासाठी सौदी अरेबियात जातात. या निर्णयामुळे भारतीयांसाठी राहणीमान सुलभ होईल आणि आर्थिक दृष्टिकोनातून मोठा फायदा होईल.अमेरिकेचा झटका आणि सौदी अरेबियाचा दिलासा – भारतीयांसाठी दोन वेगवेगळे अनुभव

read also:https://ajinkyabharat.com/sri-shivaji-college-akot-yehe-judh-nari-shakticha-venture-concluded/