रिसोड तालुक्यात शेतकरी व पिक विमाधारकांसाठी हेल्पलाईन सुरु करण्याची मागणी

रिसोडच्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार का?

रिसोड: रिसोड तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आणि पिक विमाधारकांसाठी तक्रार नोंदवण्याची हेल्पलाईन सुरू करण्याबाबत भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर यांनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्यासोबत चर्चा केली.

यावर्षी जूनपासूनच रिसोड तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आले असून, अनेक शेतकरी बांधवांनी पिक विमा भरला असला तरी विमा कंपनीकडून नाहक त्रास आणि प्रतिसाद न मिळाल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांनुसार:

  • पिक विमाधारकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावा किंवा कृषी विभागाकडून ऑफलाइन टेबल सुविधा उपलब्ध करावी.

  • चालू वर्षाचे नुकसान पिक विमा सर्वेक्षण पीक विमा कंपनीद्वारे करण्यात यावे.

  • मागील हंगामातील (2023–24) खरीप व रब्बी पिकांचा विमा अजून मिळालेला नाही तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावा.

  • अतिवृष्टी व दुष्काळी अनुदान मिळताना सर्व विमाधारकांना सरसगट लाभ दिला जावा.

आज तहसील कार्यालय रिसोड येथे लखनसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी निवेदन दिले. उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तालुका दंडाधिकारी प्रतीक्षा तेजनकर आणि तालुका कृषी अधिकारी मदन तावरे यांनी निवेदनाची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

शेतकरी बांधवांमध्ये विद्याधर दामोदर मोरे, शिवलाल देवीचंद बिजोरे, संजय आनंदा अंभोरे, दिलीप प्रल्हाद अंभोरे, नितीन मधुकरराव देशमुख, जगन्नाथ सखाराम ढोले, हरीगीर अंबरगीर गिरी, कडूजी सिताराम पंजरकर, मधुकर नरहरी मोरे, प्रकाश राजाराम मोरे, मधुकर लक्ष्मण विटकर, संजय राघोजी बिजोरे, माधव धोंडूची मापारी, सुधीर विनायक मोरे, धनंजय विठ्ठल मोरे, अशोक सुधाकर राव देशमुख, गजानन विनायक मोरे, राजेंद्र विनायक मोरे, महादेव लक्ष्मण डहाके आणि इतर शेतकरी उपस्थित होते.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/diver/