रिसोड तालुका तापीने फणानला, आरोग्य प्रशासन निद्रावस्थेत!

आरोग्य प्रशासनाचे डोळे केव्हा उघडणार

रिसोड- रिसोड तालुक्यात तापीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस

वाढ होत असल्याने तालुक्यात गंभीर आरोग्य संकट निर्माण झाले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत टायफॉईडसारखे आजार डोके वर काढत आहेत,

मात्र आरोग्य विभाग मात्र अजूनही निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

शहरातील अनेक भागांत गटारांचे साचलेले पाणी,

कुलरमधील घाणे पाणी आणि इतर ठिकाणी पाणी

साचल्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.

सध्या रिसोड शहरात टायफॉईडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात

आढळत असून ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे.

रुग्णसंख्या वाढत असताना सरकारी यंत्रणा उपाययोजनांऐवजी ‘प्रेक्षक’ बनली आहे.

खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नागरिकांना नाईलाजाने

धाव घ्यावी लागत आहे. परंतु येथे उपचार महागडे

असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.

नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून,

साचलेल्या पाण्याची विल्हेवाट,

स्वच्छता मोहीम आणि मोफत आरोग्य शिबिरे

यासारख्या ठोस उपायांची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

 नागरिकांचा सवाल : आरोग्य प्रशासनाचे डोळे केव्हा उघडणार

Read also :https://ajinkyabharat.com/barshitaki-polisanchi-dhadak-action-under-operation-prahar/