रिसोड पोलीस स्टेशनवर वृक्षारोपण

“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियान

रिसोड पोलीस स्टेशनवर वृक्षारोपण – “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” 

रिसोड – “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत रिसोड पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले. कृषि विभागाच्या १ कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टासाठी राज्य सरकारने वित्तीय वर्ष २०२५ मध्ये हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत गृह विभागासाठी ५ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठरवले गेले आहे.दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी, ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनच्या आवारात विविध फळ व इतर रोपांची लागवड करण्यात आली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक, पोलीस उपनिरीक्षक शिवचरण डोंगरे, पत्रकार शेख अन्सारोद्दीन, पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/jeeva-vachvanyasathi-rule-kadak/