रिसोड पोलिसांची धडक कारवाई
रिसोड : शहरातील आंबेडकर चौक ते लोणी फाटा या परिसरात चिडीमारी करणाऱ्या तरुणांवर रिसोड पोलिसांनी कारवाई करत समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. पोलिसांनी त्वरित हालचाल करून चार तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात कलम ११० व ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.संशयित तरुणांची नावे अशी आहेत : संघर्ष रवी पंडित (१९), रोशन मोहन वाघमारे (१८), आदित्य गौतम पंडित (१९, राहणार – रिसोड) आणि दत्ता गजानन गुलबास (१९, राहणार – निजामपूर). हे तरुण शाळा व महाविद्यालय परिसरात मुलींना छेडछाड करणे, अश्लील टिप्पण्या करणे अशा प्रकारचे वर्तन करत होते.महिला सुरक्षेच्या दृष्टीने या गंभीर बाबीकडे पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी तातडीने लक्ष घालत विशेष पथक तयार केले. तपासानंतर चौघांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणून समज दिल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली.या कारवाईमुळे विद्यार्थिनींमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे. पालकांकडूनही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. “महिला व मुलींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, अशा वर्तन करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल,” असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, पोहेकॉ प्रशांत राजगुरू, आशिष पाठक, राजेश गांगवे, रवी आढागळे, परमेश्वर भोणे, घनवट व निलेश तायडे यांनी सहभाग नोंदवला.
ही कारवाई म्हणजे रोड रोमिओंना पोलिसांची कडक चेतावणी ठरली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/navratri-festival-trinity/
