Rising Star Asia Cup : पाकिस्तानचा फक्त ३२ चेंडूत ‘खेळ खल्लास’! युएईला पराभवाचं पाणी पाजलं

Rising Star Asia Cup

दुबई : राईझिंग स्टार आशिया कप २०२५ (Rising Star Asia Cup 2025) स्पर्धेत पाकिस्तान (Pakistan) संघाची विजयी घोडदौड सुरुच आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने युएई (UAE) संघाचा ९ विकेट्सने आणि फक्त ३२ चेंडूत धुव्वा उडवला. या विजयासह पाकिस्तानने साखळी फेरीत तीनपैकी तीन सामने जिंकून अपराजित राहून उपांत्य फेरी गाठली आहे.

Rising Star Asia Cup गोलंदाजांचा कहर! युएईचा डाव ५९ धावांत आटोपला

ओमान आणि भारताला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानने युएईलाही मोठ्या फरकाने हरवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय युएईला महागात पडला. पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे युएईच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकता आले नाही.युएईचा संपूर्ण संघ १८ षटकांत केवळ ५९ धावा करून तंबूत परतला.युएईकडून सय्यद हैदरने सर्वाधिक २० धावा केल्या, तर मोहम्मद फराझुद्दीनने १२ धावांचे योगदान दिले.पाकिस्तानसाठी सुफियान मुकीम (Sufiyan Muqeem) याने ४ षटकांत १२ धावा देत ३ बळी घेतले.अहमद दानियालने २, माज सदाकतने २, तर शाहिद अजीज, अराफत मिन्हास आणि मुहम्मद शहजादने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Rising Star Asia Cup ३२ चेंडूत ६० धावांचे लक्ष्य पूर्ण !

पाकिस्तानसमोर विजयासाठी फक्त ६० धावांचे आव्हान होते आणि त्यांनी ते केवळ ५.२ षटकांत (३२ चेंडूत) पूर्ण केले.ओपनर माज सदाकत (Maaz Sadaqat) याने १५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३७ धावांची तडाखेबाज खेळी केली.तर गाजी घोरीने १२ चेंडूत नाबाद १६ धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला.पाकिस्तानने अवघ्या १ गडी गमावून हा विजय मिळवला, ज्यामुळे युएईचा स्पर्धेतील प्रवास पराभवाच्या कटू आठवणींसह संपुष्टात आला.

Rising Star Asia Cup अंतिम फेरीची शक्यता !

पाकिस्तानने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, भारताचा (India) शेवटचा साखळी सामना ओमानशी (Oman) होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. जर भारताने उपांत्य फेरी गाठून तो सामना जिंकला, तर अंतिम फेरीत क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला पाहायला मिळू शकतो.

read also : https://ajinkyabharat.com/padmashree-milind-kamble-takes-charge-as-president-of-national-institute-of-technology-srinagar/