रिधोरा सरपंच व त्यांचे पती लाचप्रकरणी अडकले एसिबीच्या जाळ्यात

सरपंच

वाशिम:-तालुक्यातील रिधोरा येथील सरपंच व त्यांचे पती यांनी ₹ 5000/- रुपये रक्कम लाचस्वीकारली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा लावून कारवाई केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, तक्रारदार यांना त्यांचे शेतात रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीच्या बांधकाम साठी रक्कम 1,41,308 रुपये चां चेक मंजूर झाला होता. मंजूर झालेल्या विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने शासना कडुन मिळणाऱ्या अंतिम देयक चेकवर सही देण्यासाठी इतर लोकसेवक सरपंच यांनी दि. 09/09/2025 रोजी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष 5000/-रु ची मागणी केली व आज दि. 09/09/2025 रोजी यशस्वी सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष 5000/-रुपये लाचरक्कम स्वीकारली. त्यावरून तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर नमुद आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन मालेगाव जि.वाशीम येथे कलम 7, 7A,12 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची वृत्त लिही पर्यंत प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई हॉटेल जय गजानन उपहारगृह जुना बायपास नागपुर ते छत्रपती संभाजीनगर रोड मालेगाव येथे करण्यात आली आहे.या प्रकरणातील तक्रारदार गोपनीय असून आरोपी वच्छला बबन खुळे वय 52 वर्ष पद – सरपंच ग्रामपंचायत रिधोरा, ता. मालेगाव जि. वाशिम आणि बबन सिताराम खुळे (सरपंच यांचा पती) वय 60 वर्ष दोन्ही रा.रिधोरा ता. मालेगाव जि. वाशिम ता. जि. वाशिम यांचेवर पोलिस कारवाई करण्यात आली आहे.हा सापळा यशस्वी करण्यासाठी तपासी अधिकारी अलका गायकवाड,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि वाशिम, पर्यवेक्षण अधिकारी जगदीश परदेशी,पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. वाशिम यांचे सह य सापळा पथकात पो.हवा. नितीन टवलारकर, विनोद मार्कंडे, राहुल व्यवहारे, योगेश खोटे, विनोद अवगळे, रविंद्र घरत चा. पो. कॉ. नाविद शेख सर्व नेमणूक ला.प्र.वि. वाशिम युनिट यांचा सहभाग होता.

read also : https://ajinkyabharat.com/antarjilha-chortiyankadun-12-motor-sacrusty-seized/