समृद्ध पंचायतराज अभियान संपन्न

सेवा पंधरवड्यानिमित्त ग्राम सीसा येथे विशेष ग्रामसभा संपन्न

बोरगाव मंजू:ग्रामपंचायत मासा सीसा (उदेगाव) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे अध्यक्षस्थान सरपंच श्री. सतीश मधुकरराव फाले यांनी भूषविले.

या वेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री. शिवाजीराव चतरकर व सरपंच श्री. सतीश फाले यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत सविस्तर माहिती गावकऱ्यांना दिली. तर मंडळ अधिकारी श्री. संजय तायडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज अभियान व सेवा पंधरवडा याबाबत माहिती देत, सीसा ते उदेगाव हनुमान मंदिर व सीसा ते कुंभारी शिवदांड रस्त्यांची पाहणी केली.

कार्यक्रमाची प्रस्तावना उपसरपंच सौ. अर्चना संजय दहातोंडे यांनी केली, तर आभारप्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशाली रवी गवई यांनी केले.

ग्रामसभेला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मंगेश पाथ्रीकर, कृषी सहाय्यक आदित्य सरदार, तलाठी श्री. सागर वानखडे, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच गावातील मान्यवर नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल सरपंच श्री. सतीश मधुकरराव फाले यांचा सत्कार करण्यात आला.

read also :https://ajinkyabharat.com/panand-rastyana-manzuri-2/