समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :

वाशीम | प्रतिनिधी

समृद्धी महामार्गावर वाशिमजवळील शेलुबाजार इंटरचेंजजवळ ३ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता एक भीषण अपघात झाला.

या अपघातात उमरेड (जि. नागपूर) येथील जयस्वाल कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

Related News

अपघात इतका भीषण होता की, ईर्टिगा वाहनाचा पूर्ण चुराडा झाला.

प्राप्त माहितीनुसार, जयस्वाल कुटुंब पुण्यात कौटुंबिक कार्यक्रम आटोपून MH-40-BJ-7206 क्रमांकाच्या ईर्टिगा कारने उमरेडकडे परतत होते.

दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील चॅनल क्र. २१५ वर पलटी झाली.

यामुळे वैदेही जयस्वाल आणि माधुरी जयस्वाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तर राधेश्याम जयस्वाल, संगीता जयस्वाल आणि चालक चंदन हेलगे हे गंभीर जखमी झाले.

जखमींना वाशीम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान राधेश्याम आणि संगीता जयस्वाल यांचाही मृत्यू झाला.

सध्या चालक चंदन हेलगे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

अशी आहेत मृतांची नावे

  • वैदेही किर्ती जयस्वाल (वय २४, इतवारी पेठ, उमरेड)

  • माधुरी किर्ती जयस्वाल (वय ५२, इतवारी पेठ, उमरेड)

  • संगीता अजय जयस्वाल (वय ५२, हनुमान नगर, नागपूर)

  • राधेश्याम शिवनारायण जयस्वाल (वय ६६, इतवारी पेठ, उमरेड)

माय-लेकीच्या मृत्यूने समाजमन हेलावले

या अपघातात वैदेही आणि तिची आई माधुरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

राधेश्याम व संगीता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जयस्वाल कुटुंबाच्या घरावर शोककळा पसरली असून संपूर्ण उमरेडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

चालकाची झोप ठरली अपघाताचे कारण?

चालकाला डुलकी आल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता आहे.

गाडीचा वेग अधिक होता, त्यामुळे नियंत्रण सुटल्याचेही सांगण्यात येत आहे.

वाहतूक नियमांचे पालन, चालकांची विश्रांती, आणि वाहन तपासणी या बाबींवर भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

या अपघाताने एक संपूर्ण कुटुंब उजाडले असून, उमरेडमध्ये शोकमय वातावरण आहे.

मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/nagpurmadhyaye-vaidyakshetra-kranti-consarma/

Related News