Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Miguel Angel Lopez Dias Passes Away : प्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टीरियो सीनियर यांचं निधन झालं आहे. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ कुस्ती खेळली. 

Miguel Angel Lopez Dias Passes Away : प्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टीरियो सीनियर यांचं निधन झालं आहे. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ कुस्ती खेळली. 

WWE Wrestler Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध मेक्सिकन कुस्तीपटू रे मिस्टेरियो सीनियर (Rey Misterio Sr) यांचं निधन झालं आहे.

त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. WWE रेसलर रे मिस्टेरिओ याचे काका आणि प्रशिक्षक रे मिस्टेरिओ सिनियर यांचं वयाच्या 66 व्या वर्षी निधन झालं आहे.

मिस्टेरियो सीनियर यांनी अनेक दशक रेसलिंग रिंग गाजवली आहे.

Related News

त्यांनी शेवटची कुस्ती 2023 मध्ये खेळली होती.

त्यानंतर त्यांनी इतर कुस्तीपटूंना ट्रेनिंग देण्यावर लक्ष केंद्रीत केलं, त्यांनी व्यावसायिक कुस्तीवर लक्षणीय प्रभाव पाडला.

त्यांच्या पुतण्याला आणि इतर कुस्तीपटूंना मार्गदर्शन केलं. AAA आणि रेसलिंग विश्वाकडून यावर शोक व्यक्त केला जात आहे.

रे मिस्टेरियो सीनियर यांचं निधन

मिगुएल एंजेल लोपेझ डायस (Miguel Angel Lopez Dias Death) उर्फ रे मिस्टेरियो सिनियर

(Rey Misterio Sr) यांचं 20 डिसेंबर 2024 रोजी निधन झाल्याची बातमी कुटुंबाने दिली आहे.

प्रसिद्ध मेक्सिकन कुस्तीगीर रे मिस्टेरियो सीनियर यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

. मिस्टेरियो सीनियर यांनी वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन आणि लुचा लिब्रे एएए

वर्ल्डवाइड सारख्या प्रमुख रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले.

ही स्पर्धा WWE इतकीचं महत्त्वाची मानली जाते.

मिस्टेरियो सीनियर यांनीवयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मिस्टेरियो सीनियर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली प्रतिभा दाखवली. त्यांनी 1990 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगच्या

स्टारकेडमध्ये उत्तम कामगिरी केली. त्यांनी जगभरातील असंख्य चाहते आणि खेळाडूंना प्रेरणा दिली. मिस्टेरियो सिनियर यांचं खरं

नाव मिगुएल एंजेल लोपेझ डायस (Miguel Angel Lopez Dias Death) होते. यांच्या

निधनाची बातमी लुचा लिब्रे एएएने (Lucha Libre Royalty AAA) एक्सवरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

मिगुएल एंजेल लोपेझ डायस उर्फ रे मिस्टीरियो सीनियर यांचं निधन

या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे, “रे मिस्टीरियो सीनियर म्हणून ओळखले जाणारे

मिगुएल एंजेल लोपेझ डायस (Miguel Angel Lopez Dias) यांच्या संवेदनशील निधनाबद्दल आम्हाला दु:ख आहे.

आम्ही त्यांच्या प्रियजनांना आमच्या मनापासून शोक व्यक्त करतो आणि

त्यांच्या चिरंतन विश्रांतीसाठी स्वर्गात प्रार्थना करतो,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या  Read Also :  https://ajinkyabharat.com/shivni-airport-extension-gunta-is-still-not-wide-runway-length-will-be-extended-by-1100-meters/

 

 

Related News