क्रांतिकारी संघटनेने कृषी विभागाकडे कारवाईची मागणी

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक

रिसोड: तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर बियाणे व खत चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रार क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कृषी विभागाकडे नोंदवली आहे. संघटनेच्या मते, सतत ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून, केंद्रांवर या चुकीच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे.निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक कृषी केंद्रावर खते व बियांनाचे भावफलक लावावे, शेतकऱ्यांना खरेदीची पावती देण्यात यावी, तसेच लिंकिंग प्रमाणे खत विक्री करणाऱ्यांवर आणि बोगस जैविक औषध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी.क्रांतिकारी शेतकरी संघटनेने चेतावणी दिली आहे की, जर या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. यावेळी निवेदन देताना युवा जिल्हाध्यक्ष सतीश इढोळे पाटील, बालाजी पाटील मोरे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

read also : https://ajinkyabharat.com/akola-patur-rhodwel-chikhalgav-yatheel-incident/