विश्रामगृहातील टॉयलेट खिडक्यांना काचा नसल्याने अधिकाऱ्यांची होरपळ

विश्रामगृहातील टॉयलेट खिडक्यांना काचा नसल्याने अधिकाऱ्यांची होरपळ

व्हीआयपींच्या गुप्ततेवर गदा – प्रशासनाचे दुर्लक्ष?

कारंजा (सुनील फुलारी):

कारंजा शहरातील शासकीय विश्रामगृह हे बाहेरून जितके आकर्षक दिसते, तितकेच आतून गैरसोयींनी ग्रासलेले आहे,

हे वास्तव सध्या उघड होत आहे. विशेषतः या विश्रामगृहातील टॉयलेट व बाथरूमच्या खिडक्यांना

काचा नसल्यामुळे येथे थांबणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच गोची होत असल्याचे समोर आले आहे.

सदर टॉयलेट व बाथरूमच्या खिडक्या मोकळ्या असल्यामुळे कोणतीही बाहेरील व्यक्ती सहज आत डोकावू शकते.

त्यामुळे गुप्ततेचा अभाव जाणवत असून, यामुळे विश्रामगृहात थांबणाऱ्या व्हीआयपी अधिकाऱ्यांची अस्वस्थता वाढली आहे.

विश्रामगृह म्हटले की, तेथे सर्व मुलभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा असणे अपेक्षित असते.

मात्र, कारंजा शहरातील विश्रामगृहात ही अत्यंत प्राथमिक आणि गरजेची सुविधा – म्हणजे बाथरूमच्या खिडकीला काच

लावणे – दिली गेलेली नाही, हे निश्चितच प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण आहे.

यासंदर्भात अनेक अधिकारी आणि व्हीआयपी पाहुण्यांनी तक्रारी नोंदवल्या असून, “खिडक्यांना काच नसल्यामुळे अस्वस्थता वाटते,

ही बाब तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन काही अधिकाऱ्यांनी केले.

तरी संबंधित यंत्रणांनी याची तातडीने दखल घेऊन संडास व बाथरूमच्या खिडक्यांना मजबूत व सुरक्षित काचा बसवाव्यात,

अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा येणाऱ्या दिवसांत व्हीआयपी अधिकाऱ्यांच्या गैरसोयीमुळे विश्रामगृहाची बदनामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Also : https://ajinkyabharat.com/medshi-campus/