उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक तरुणी राहत होती. ती तिथे आपल्या उपजीविकेसाठी छोटं, मोठं काम करत होती.
एक दिवस अचानक तिथे पोलीस पोहोचले, त्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एक तरुणी राहत होती. ती तिथे आपल्या उपजीविकेसाठी छोटं, मोठं काम करत होती.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
एक दिवस अचानक तिथे पोलीस पोहोचले. पोलिसांनी त्या तरुणीला तीच वय विचारलं.
त्यावर तिने जे उत्तर दिलं ते ऐकून पोलिसांनाही मोठा धक्का बसला.
तीचं वय ऐकून पोलीस अधिकार्याला खात्री पटली की गेल्या वर्षभरापासून ते ज्या मुलीला शोधत होते,
ती तीच मुलगी आहे. जेव्हा या मुलीने आपली आपबिती सांगितली तेव्हा सर्वजन सुन्न झाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
हा सर्व प्रकार प्रेमप्रकरणातून घडला आहे. संबंधित तरुणी प्रेमात एवढी वेडी झाली की तिला तिच्या घरच्यांचा विसर पडला.
तिने चित्रपटात जसं पाहिलं होतं, हिरो-हिरोईन पळून जाऊन लग्न करतात.
त्यानंतर ते एकमेकांसोबत आयुष्यभर आनंदानं संसार करतात. स्वत:च घर बनवतात तसंच काहीसं स्वप्न या मुलीनं देखील पाहिलं.
आपनही आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करू, त्याच्यासोबत आनंदानं राहू असं या मुलीला वाटलं.
तिने कोणताही विचार न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता तीने तिच्या प्रियकरासोबत घर सोडलं.
ते दोघे पळून गेले. मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्यानं तिचे कुटुंब हवालदिल झाले.
त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला.
त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.
ही घटना 3 फेब्रुवारी 2024 रोजीची आहे. उत्तर दिल्लीच्या नरेला परिसरात
राहणारी 16 वर्षांची मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली.
त्यानंतर तिच्या कुटुंबाला असं कळलं की ती तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या मुलासोबत पळून गेली आहे.
या मुलाचं वय 19 वर्ष होतं. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते,
मात्र त्याची कल्पना या मुलीच्या घरच्यांना नव्हती. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर हा सर्व प्रकार तिच्या घरच्यांना कळाला.
त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. आता एक वर्षानंतर या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे.
आग्रामध्ये ही मुलगी सापडली. पोलिसांनी या मुलीला तिच्या कुटुंबाकडे सोपावलं आहे.
घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माबिती पोलिसांकडून देण्यात आली.
वीस हजारांचं बक्षीस
या मुलीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस हजारांच्या बक्षीसाची देखील घोषणा करण्यात आली होती.
ही मुलगी घरातून पळून गेल्यानंतर आधी मुंबईला आली, त्यानंतर ती आग्रा येथे पोहोचली.
तिच्यासोबत जो मुलगा होता त्याच्याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाहीये.