डॉ. सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर विधानसभा
मतदारसंघात क्रांतिदिनाचे औचित्य साधून
दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ पासून ‘परिवर्तन संकल्प यात्रेचे’ आयोजन
Related News
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यभर सुरू असलेली
आरक्षण बचाव यात्रा ही दिनांक ०५ औगस्ट २०२४ रोजी
मूर्तीजापूर मतदार संघात येणार आहे.
एस.सी., एस.टी., समाजातील कार्यकर्ते व नागरिक आरक्षण
बचाव यात्रेचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारीला लागलेले आहेत.
तसेच तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते
मूर्तीजापुर विधानसभा मतदारसंघात गावोगावी जाऊन नागरिकांना
आरक्षण बचाव यात्रेसाठी सहभागी होण्याचे आव्हाण करत आहेत.
राज्यात या यात्रेचा समारोप दिनांक ०७ औगस्ट २०२४ रोजी
औरंगाबाद येथे होणार आहे. याच विचारांनी प्रेरित होऊन
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात क्रांतिदिनाचे औचित्य साधून
०९ औगस्ट २०२४ पासून ‘परिवर्तन संकल्प यात्रेचे’ आयोजन
डॉ.सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.
मूर्तिजापूर व बार्शिटाकळी या तालुक्यांमध्ये अनेक समस्यांना
नागरिक सामोरे जात आहेत. भौतिक पायाभूत सुविधा,
शेतकऱ्यांना मदत न मिळणे, रोजगाराचा अभाव, महिला सक्षमीकरण
अशा अनेक विकासापासून जनता दूर राहत आहे.
या भागातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी जनतेची बाजू मांडणे अपेक्षित असतांना
त्यांच्या उदासीनतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तिजापूर मतदारसंघात सामाजिक कार्याच्या
माध्यमातून जनतेची सेवा करणारे डॉ. सुगत वाघमारे यांनी
जनतेच्या न्याय, हक्कासाठी आवाज उचललेला आहे.
परिवर्तन संकल्प यात्रा या संकल्पनेतून आता जनतेला न्याय मिळवून देण्याची
त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये यात्रेच्या माध्यमातून
जनतेशी संवाद साधने व प्रमुख समस्या जाणून घेण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
डॉ. वाघमारे यांच्या नेतृत्वात परिवर्तन संकल्प यात्रेचे आयोजन
करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील
जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या लोकभावना जाणून घेण्याचा प्रयत्न
डॉ. सुगत वाघमारे हे करणार आहेत. या परिवर्तन संकल्प यात्रेची
माहिती देताना तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष
डॉ. सुगत वाघमारे म्हणाले की, आता मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात
परिवर्तनाची गरज आहे. विशेषतः वंचितांचा आवाज बुलंद करण्याची वेळ आलेली आहे.
मूर्तिजापूर शहर व लगतच्या गावात पाणीपुरवठा सुव्यवस्थित करणे,
मूर्तीजापूर तालुक्यातील शकुंतला रेल्वे ही ब्रॉडगेज झाली पाहिजे
या साठी अचलपुर – दर्यापुर मधून जी चळवळ उभी राहिली आहे
त्याचे आम्ही समर्थन करतो. मूर्तीजापूर व बार्शिटाकळी शहराचे
सुशोभीकरण व स्वच्छतेवर भर देण्यात येईल. सर्व धार्मिक स्थळांचे
सूशोभीकरण व मूलभूत सुविधांवर लक्ष केन्द्रित केले जाईल.
मूर्तिजापूर बार्शिटाकळी येथे MIDC पुनर्जीवित करण्याचा संकल्प
हाती घेतला असून त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल.
ग्रामीण व दुर्गम भागातील माझ्या माता भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी
स्वयंरोजगार निर्मिती करून त्यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासाठी
टीम उभी करू. गाव तिथे आरोग्य केंद्र उभारणार तसेच गेल्या ७० वर्षापासून
मूर्तीजापूर मतदार संघात क्रीडा क्षेत्रात भरीव कमगिरिची गरज आहे,
क्रीडा क्षेत्रातील अनेक पायाभूत सुविधा व व्यायाम शाळा
उपलब्ध करून देण्याची गरज आहे. घरकुल योजनेच्या लाभापासून
वंचित असलेल्या परिवारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
या निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघाचा विकास साधणे हेच ध्येय केंद्रस्थानी ठेवून
आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे. त्यामुळे या परिवर्तन संकल्प यात्रेत
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन डॉ. वाघमारे यांनी यावेळी केले.
यावेळी तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे सदस्य
आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.