पश्चिम बंगाल विधानसभेत ‘नीट’ विरोधात ठराव मंजूर

राज्य सरकार

राज्य सरकार सादर करणार नवीन वैद्यकीय प्रवेश परीक्षा

तामिळनाडू, कर्नाटकनंतर आता पश्चिम बंगाल विधानसभेतही

नीटविरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे.

Related News

बंगाल विधानसभेत नीट परीक्षेतील गडबडीविरोधातील ठराव मंजूर करण्यात आला.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील TMC सरकारने मंगळवारी

NEET-UG मुद्द्यावर प्रस्ताव मांडला होता.

त्यावर बुधवारी चर्चा होऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

हा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री सोवनदेव चट्टोपाध्याय यांनी मांडला.

बंगाल सरकारने सांगितले की,

बंगालला मेडिकलसाठी नीट परीक्षेपासून दूर ठेवायचे आहे.

बंगालपूर्वी तमिळनाडू आणि कर्नाटक विधानसभेतही असाच प्रस्ताव मंजूर झाला होता.

या तीनही राज्यांचे म्हणणे आहे की, त्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तीच जुनी पद्धत हवी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या एका दिवसानंतर

बंगाल विधानसभेने हा ठराव मंजूर केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे सांगितले होते.

वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

पश्चिम बंगाल राज्य सरकार नवीन प्रवेश परीक्षा सुरू करणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि

नीटच्या केंद्रीकृत स्वरूपावरील चिंता दूर करणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/6-decisions-of-shinde-government-after-budget/

Related News