अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण
संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना
Related News
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटक
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक...
Continue reading
धुळे: शिरपूर तालुक्यात आईने दोन मुलांसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना; एकाच वेळी मृत्यू, संशयित पतीला पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील शिरपूर ता...
Continue reading
प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत: मानसिक ताण, चिंता आणि नैराश्याबाबत खुलासा
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव स...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
AI Impact Summit 2026 : रिलायन्स जिओ देणार “स्वस्त AI” – भारताला २१व्या शतकातील AI महाशक्ती बनवण्याचे स्वप्न, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
AI ...
Continue reading
MIM चा राज्यसभेत प्रवेश? ओवैसींचा भडकलेल्या आमदारांचा दावा
बिहारमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापल...
Continue reading
तरुण व्यावसायिकांमध्ये वाढत आहे डीप व्हेन थ्रॉम्बोसिसचा धोका
आधी वृद्धांपुरता मर्यादित समजल्या जाणाऱ्या डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT)
Continue reading
मेंदूच्या जखमे नंतर हालचाली पुन्हा शिकण्याची प्रक्रिया : डॉक्टरांनी बॉबथ पद्धतीची माहिती दिली
मेंदूची जखम किंवा न्युरोलॉजिकल इज...
Continue reading
घरच्या घरी चाट बनवताना टाळा हे ६ सामान्य चुका, जे चवीत बिघडवू शकतात
चाट ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड्सपैकी एक आहे. प्रत्येक राज्यात चाटची विविध...
Continue reading
संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जोपर्यंत सूर्य-चंद्र
आहे, तोपर्यंत भारताचे संविधान राहील. संविधानाने दिलेले आरक्षण राहील.
आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र
निषेध करतो, असे सांगत खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर
असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य
मंत्री ना रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी
यांच्याविरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास
आठवले यांनी दिली. १३ सप्टेंबर रोजी मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने
आझाद मैदान मुंबई येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात
येणार आहे, असे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी सांगितले. सामाजिक दृष्ट्या
भारतात सामंजस्य निर्माण झाल्यानंतर सामाजिक आरक्षण संपवण्याचा निर्णय
काँग्रेस घेईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे.
या वक्तव्यातून राहुल गांधींनी काँग्रेस ही आरक्षण विरोधी असल्याचेच उघड केले आहे.
काँग्रेस सर्वाधिक काळ देशात सत्तेत राहिली आहे. त्यांच्या काळात दलितांवर अधिक
अत्याचार झाले आहेत. दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले
आरक्षण हे त्यांचे कवच कुंडल आहे. आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल
गांधीना गरज काय होती, अशी विचारणा रामदास आठवले यांनी केली.
दरम्यान, आरक्षण संपविण्याचा भाषा करणाऱ्या राहुल गांधींना दलित आदिवसी
मागासवर्गीय धडा शिकवतील. परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे
हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे उद्योग आहेत. भारतात लोकतंत्र नाही, असे परदेशात
जाऊन बरळणे चूक आहे. लोकशाही आणि आरक्षणबाबत परदेशात जाऊन चुकीची
वक्तव्य करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो,
अशी टीका आठवले यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/major-accident-due-to-rain-in-datia/