नरनाळा महोत्सवासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता: अर्ज मागविले

नरनाळा

अकोला, दि. 22 : नरनाळा निसर्ग पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव दि.30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, त्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. इच्छूकांनी दि. 26 जानेवारीपर्यंत पोर्टलवर किंवा अकोट वन्यजीव विभाग येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपवनसंरक्षक राहूलसिंह टोलिया यांनी केले आहे.

पर्यटकांना मार्गदर्शन, माहिती देणे, नोंदणी व स्वागत व्यवस्था, स्वच्छता, विविध कामांत व आपत्कालीन स्थितीत सहकार्य आदी कामे स्वयंसेवकांकडून होणे अपेक्षित आहे. अर्ज करण्यासाठी किमान पात्रता दहावी उत्तीर्ण असून, वनविभागात पूर्वीचा अनुभव असलेले व स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्जात नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्र., शैक्षणिक अर्हता, इच्छूक कामाचे स्वरूप आदी नमूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी narnalafest.in या पोर्टलवर अर्ज दि. 26 जानेवारीपूर्वी करावा. अधिक माहितीसाठी ए.एम. तराळे, मुख्य लेखापाल, अकोट वन्यजीव विभाग, अकोट भ्र.क्र.-9960846080, तसेच पोर्टलबाबत माहितीसंदर्भात ई मेल-admin@narnalafest.in भ्र.क्र.7840935372 या क्रमांकावर संपर्क साधावा.
निवड झालेल्या स्वयंसेवकांना कार्यालयामार्फत दि.27 जानेवारी रोजी कळविण्यात येईल व दि. 28 जानेवारीला ओळखपत्र देऊन कार्यपालनाबाबत आवश्यक सुचना देण्यात येतील. वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावरही सूचना पहावयास मिळतील.

read also :  https://ajinkyabharat.com/chhattisgarh-steel-plant-blast-shocking-explosion-6-workers-dead-5-seriously-injured-industrial-safety-minister-big-question-mark/