विद्यापाठच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद आक्रमक

अकोल्यात

अकोल्यात अमरावती विद्यापीठ प्रशासना विरोधात रिपब्लिकन

बहुजन विद्यार्थी परिषदेचे ढोल बजाव आंदोलन केले.

अकोल्यात आज रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने

Related News

अमरावती विद्यापीठ प्रशासनाविरोधात अनोखं आंदोलन करण्यात

आलं आहे. यावेळी ढोल वाजवत कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्यासह

दोन उपमुख्यमंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ कुलगुरू यांच्या

प्रतिमेला बेशरमच्या फुलांचा हार घातला. यावेळी सरकार आणि विद्यापीठ

प्रशासना विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या

सामाजिक न्याय विभागाच्या होत असलेल्या विविध योजनांच्या अन्यायाविरुद्ध,

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन

सोसायटी द्वारा स्थापन केलेल्या महाविद्यालय जीर्ण होत असल्याबत आणि

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभाराविरोधात

रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने हे अनोखं आंदोलन केल.

यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी तथा विद्यार्थी

मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-gadchiroli-district-100-villages-lost-contact/

Related News