राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर!

राज्यातील १४ आयटीआयचे नामांतर करण्यात आले आहे.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा निर्णय घेतला

असून आयटीआयला नाव देताना सामाजिक व जातीय

Related News

समीकरणांचा विचार करण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.

ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्यात

आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जेथे शिकले त्या एल्फिन्स्टन

महाविद्यालयातील आयटीआयला बाबासाहेबांचे नाव देण्यात आले

आहे. कोल्हापूरच्या आयटीआयला शाहू महाराजांचे आणि बीडच्या

आयटीआयला विनायक मेटे यांचे नाव देण्यात आले आहे. नवी

मुंबईतील आयटीआयला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात आले

आहे. याशिवाय लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम

महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय

घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,

ठाण्यातील आयटीआयला धर्मवीर दिघेंचे नाव देण्यात आले आहे.

पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आले

आहे. सर्वसामान्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले

आहेत. विनायकराव मेटेंचे कार्य मोठे आहेत. त्यामुळे त्यामुळे

सरकारकडुन एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांचं ही नाव देण्यात

आलं आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sarpanch-deputy-sarpanch-will-be-honored-with-double/

Related News