लोणार(प्रतिनिधी):-
लोणार तालुक्यातील गोत्रा या गावातील काळोबा महाराज नाग मंदिर हे गेल्या ५० ते ६० वर्षांपासून श्रद्धेचे व भक्तीचे केंद्र बनले आहे.
नागपंचमीच्या दिवशी या मंदिरात केवळ तालुक्यातूनच नव्हे तर इतर जिल्ह्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
या मंदिरास सर्प व नागदेवतेशी संबंधित एक विशेष पौराणिक व लोकविश्वासात्मक महत्व आहे.
मंदिराच्या बाजूला आढळणारी खास लाल माती ही येथे येणाऱ्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरते.
या लाल मातीलालाल कपड्यांमध्ये बांधून घरात ठेवल्यास घरात साप येत नाहीत, असा स्थानिकांचा ठाम
विश्वास आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी ही माती घेण्यासाठीही भाविकांची झुंबड उडते.
त्याचप्रमाणे, गावकरी सांगतात की, पूर्वीच्या काळात एखाद्याला साप चावल्यास त्याला या मंदिरात आणले जात असे.
दर्शन घेतल्यानंतर त्या व्यक्तीवरील सर्पदंशाचे विष कमी होई आणि त्याचा जीव वाचत असे, अशी श्रद्धा लोकांमध्ये आजही आहे.
आज या ठिकाणी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संघटक प्राध्यापक गोपाल बच्छिरे यांनी या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी सुरू असलेल्या बारीमध्ये टाळ वाजवून सहभाग घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत गजानन जाधव तानाजी मापारी कैलास अंभोरे, लुख लूखमान कुरेशी, सुदन अंभोरे, इतर पदाधिकारी हजर होते.
आध्यात्मिक वारसा आजही श्रद्धेने जपला जातो.
दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी येथे पारंपरिक विधी, अभिषेक, पूजा तसेच नागदेवतेचे विशेष पूजन केले जाते.
महिलावर्ग विशेषतः या दिवशी मंदिरात मोठ्या संख्येने सहभागी होतो.
अनेक महिला या दिवशी व्रत धरतात, तर काही घरांमध्ये झाडाला झोके बांधून मैत्रिणींसह झोके खेळण्याची परंपरा पाळतात.
गोत्रा येथील नागमंदिराचा हा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा आजही श्रद्धेने जपला जात असून,
येथील श्रद्धा, आख्यायिका आणि लोकविश्वास यामुळे दरवर्षी हजारो भाविक येथे भेट देतात.