राज्यात आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील आठ

शसकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. यामुळे

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी ८०० जागा नव्याने वाढणार आहेत.

Related News

मान्यता दिलेल्या बहुतेक महाविद्यालयात पुरेसे अध्यापक नाहीत

तसेच इमारतीपासून हॉस्टिल सुविधा नसतानाही याबाबतच्या अटी

पूर्ण करण्याच्या हमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना

मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी मुंबई व

नाशिक येथे ५० प्रवेश क्षमता असलेल्या दोन वैद्यकीय

महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. आता नव्याने केंद्र सरकारने

आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे राज्यात आता

एकूण ४१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असतील. शासकीय

वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची एकूण प्रवेश क्षमता ५०५०

एवढी असून नव्याने जागा वाढल्याने ती ५८५० एवढी होणार आहे.

अंबरनाथ, गडचिरोली, वाशीम, जालना, बुलढाणा, हिंगोली व

भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना १०० प्रवेश

क्षमतेसाठी मान्यता देण्यात देण्यात आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय

वैद्यकीय आयोगाच्या तपासणीत या महाविद्यालयांमध्ये पुरसे

अध्यापक तसेच इमारतीसह आवश्यक सुविधा नसल्यामुळे

मान्यता नाकारण्यात आली होती. मात्र राज्यातील आगामी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने

अटींची पूर्तता करण्याच्या हमीवर या आठ महाविद्यालयांना

मान्यता दिली आहे. २०१९ मध्ये आर्थिकदृट्या मागासांना कोटा

निश्चित केल्यानंतर राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

९५० जागांची भर पडली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी

राज्यात आठ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असली तरी

केंद्रीय वैद्यकीय आयोगाच्या २०२० च्या किमान पात्रता निकषांची

पूर्तता या महाविद्यालयांनी केलेली नाही. पुरेसे मुनष्यबळ व

अध्यापक नाहीत तसेच इनारतींसह पायभूत सुविधांचा अभाव

असून लवकरात लवकर या अटींची पूर्तता केली जाईल या हमीच्या

आधारे या महाविद्यालयांना ही मान्यता देण्यात आली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/yanda-padnar-kadakyaachi-thandi/

Related News