RCB Captain Announced IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघाचा कर्णधार
कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
अशातच चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली असून आरसीबीने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
मुंबई : क्रीडा विश्वातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
आयपीएलच्या १८ व्या मोसमासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
आरसीबीने कर्णधारपदाची जबाबदारी स्टार खेळाडू रजत पाटीदार याच्याकडे सोपवली आहे.
Related News
आरसीबीच्या चाहत्यांना आशा होती की पुन्हा एकदा विराट कोहलीकडे कर्णधारपद जाईल.
पण टीम मॅनेजमेंटने युवा खेळाडू रजत पाटीदारच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली आहे.
आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतापदावर नाव कोरता आलेले नाही.
यंदा रजत पाटीदारच्या कर्णधारपदाखाली आरसीबीचं नशीब फळफळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रजत पाटीदार हा २०२१ पासून आरसीबीसोबत असून त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर टीममधील स्थान भक्कम केले होते.
आयपीएल २०२५ च्या लिलावाआधी त्याला आरसीबीने रिटेन करण्यासाठी ११ कोटी मोजले होते.
रजत पाटीदार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतो.
आता झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात फायनल गाठली होती.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये १० सामन्यात ६१.१४ च्या सरासरीने ४२८ धावा काढल्या होत्या. यामध्ये त्याने ५ अर्धशतक केली होतीत.
३१ षटकार आणि ३२ चौकारांचा पाऊस त्याने पाडला होता. शांत स्वभावाच्या पाटीदारकडे आता आरसीबीसारख्या मोठ्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आयपीएलमध्ये रजत पाटीदार याने २७ सामने खेळले असून ३४.७४ च्या सरासरीने ७९९ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ अर्धशतके आणि १ शतकाचा समावेश आहे.
आरसीबीचा पाटीदार हा आठवा आणि चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी राहुल द्रविड, अनिल कुंबळे, विराट कोहली आणि आता चौथा रजत पाटीदार असणार आहे.
तर विदेशी खेळाडूंमध्ये केवीन पीटरसन, डॅनियल व्हिटोरी, शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
मात्र कोणालाही विजेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. आता रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात चाहत्यांना विजेतेपदाची आस लागून राहिली आहे.
आयपीएल २०२५ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिल साल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिकल,
स्वस्तिक चिकारा, लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल पंड्या, टिम डेव्हिड, जेकब बेथेल, रोमारियो शेफर्ड, स्वप्नील सिंग,
मनोज भानागे, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम, यश दयाल, सुयश शर्मा, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
Read more news:https://ajinkyabharat.com/holiday-adaklelya-sunita-williamschaya-ghar-banebaddal-akhher-anandchi-baatmi/