रस्त्याची डागडुजी थातुरमातुर : अभियंता फिरकेना !

रस्त्याची डागडुजी थातुरमातुर : अभियंता फिरकेना !

तालुका प्रतिनिधी पातुर : प्रधान मंत्री ग्रामीण सडक योजने अंतर्गत पातूर तालुक्यातील

सुकळी ते चतारी खेट्री चांगेफळ पिंपळखुटा या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते.

रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे केल्याने दोन वर्षातच रस्त्याची चाळणी आहे.

Related News

नुकतेच रस्त्याचे थातुरमातुर डागडुजी करून पुन्हा देयक हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करता वेळी कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांची मिलीभगत असल्याने

रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये मुरुमाऐवजी पिवळ्या मातीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

त्यामुळे निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरणाचे काम परिसरातील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा काम बंद पाडले होते.

त्यामुळे दोन वर्षापर्यंत काम रखडले होते.नंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले,

मात्र निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने दोन वर्षातच रस्त्याची चाळणी झाल्याने डागडुजी करण्याची वेळ आली ,

नुकतेच चाळणी झालेल्या डांबरीकरण रस्त्याची डागडुजी दर्जेदार व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती.

परंतु डागडुजी थातुरमातुर करून देयक हडपण्याचा प्रयत्न सुरु आहे.

याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन दर्जेदार डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

बॉक्स
शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी !
पातूर तालुक्यातील सुकळी ते पिंपळखुटा या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी शासनाने

सहा कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे केल्याने

दोन वर्षातच रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ आली असून,डागडुजी सुद्धा थातुरमातुर करून देयक हडपण्याचा प्रयत्न होत आहे.

बॉक्स
अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष
पातूर तालुक्यातील सुकळी पिंपळखुटा हे गाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने संबंधित

अधिकारी व लोकप्रतिनिधी फिरकत नसून, त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे .त्यामुळे कंत्राटदार

व संबंधित अभियंता यांची मिलीभगत असल्याने शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/savarichaya-paashatun-yuvakchi-murder-accused-attake/

Related News