कारंजा –राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज 29 ऑगस्ट,
शुक्रवार रोजी आर. जे. चवरे प्राथमिक शाळा,
हायस्कूल व कॉन्व्हेंटमध्ये मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करत
विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते मेजर ध्यानचंद
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी क्रीडाशिक्षक रोकडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना
मेजर ध्यानचंद यांच्या भारतीय हॉकी क्षेत्रातील योगदान,
साधी जीवनशैली आणि खेळाप्रती असलेले समर्पण याबाबत माहिती दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. या रॅलीमध्ये कारंजा तहसीलदार झालटे,
नायब तहसीलदार हरणे, उपविभागीय अधिकारी देवरे तसेच शिक्षकवर्ग,
मुख्याध्यापिका आणि ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
रॅलीदरम्यान विद्यार्थी भारतातील ऑलिंपिक खेळाडूंच्या प्रतिकृती,
ऑलिंपिक ध्वज व विविध खेळांचे साहित्य सादर करत लोकांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांच्या घोषणांनी “खेळांमुळे आरोग्य सुधारते”,
“खेळाडू घडवा – देश घडवा” परिसर दुमदुमून गेला.
या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यामुळे समाजात खेळांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठा
हातभार लागला आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाची महती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.
read also :https://ajinkyabharat.com/musadhar-pavsat-34-year-old-woman-kamaganga-nadiit-wahoon-gali/