राष्ट्रसंत सेवा आश्रमातर्फे संत लिलामाता यांना मौन श्रद्धांजली अर्पण

राष्ट्रसंत सेवा आश्रमातर्फे संत लिलामाता यांना मौन श्रद्धांजली अर्पण

पातुर (तालुका प्रतिनिधी)

पातुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रमात संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा संत लिलामाता यांच्या पुण्यतिथी

निमित्त मौन श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चैत्र शुद्ध दशमी या दिवशी गुरुदेव प्रेमी

Related News

महिला-पुरुष आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला.

संत लिलामाता यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याकडून गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार कार्याची दीक्षा घेतली होती.

त्यांनी पातुर-बाळापूर रोडलगत सेवाश्रमाची स्थापना सुमारे ५० वर्षांपूर्वी केली होती.

त्यांच्या नेतृत्वाखाली दररोज सामुदायिक ध्यान, प्रार्थना, ग्रामगीता तत्वज्ञान प्रचार आणि राष्ट्रधर्माचे कार्य अखंडपणे सुरू राहिले.

सन २०१३ मध्ये चैत्र शुद्ध दशमी रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी त्यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली जाते.

यावर्षी देखील, त्यांच्या पुण्यस्मरणार्थ सामुदायिक ग्रामगीता पारायण, भजन-कीर्तन आणि सामुदायिक भजनगायन

यांसारख्या अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विश्वस्त संजय पाटील यांनी संत लिलामाता

यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व त्यांच्या जीवनशैलीचा आदर्श घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

या कार्यक्रमास सौ. शालिनी पाटील, सौ. नर्मदाबाई गाडगे, नंदाबाई गाडगे, रूपालीताई येनकर, योगिता उमाळे,

शिवाजी कुकडकर, शोभाताई कोथळकर, रमेश कोथळकर, दिलीप खाकरे, सुधाकरराव उगले, अर्चना उमाळे,

वर्षाताई अटायकर, गीताबाई बंड, चंद्रभागाबाई अटायकर, मालाताई भाजीपाले,

अरविंद भाजीपाले यांच्यासह अनेक गुरुदेव प्रेमी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News