बलात्कार नाही तर हुंडाबळी..! गुन्हे विभागाचा थक्क करणारा रिपोर्ट

कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव..? फसवणूक, अत्याचार, बलात्कार… या कारणांमुळे अनेक तरुणींनी आपलं आयुष्य संपवलं किंवा त्यांची हत्या झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो. पण आता गुन्हे विभागाने दिलेला धक्कादायक रिपोर्ट वेगळंच वास्तव समोर आणतो आहे. बलात्कारामुळे नव्हे तर हुंडा आणि सासरी होणाऱ्या जाचामुळे अनेक मुलींचे बळी गेले आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण अजून ताजं असतानाच, ग्रेटर नोएडा येथे 28 वर्षीय निक्की भाटी हिची पती व सासरच्यांनी निर्दयी हत्या केली. हुंड्याच्या कारणावरून तिला मारहाण करून पेटवून दिल्याची भीषण घटना देशाला हादरवून गेली आहे. NCRB चा रिपोर्ट काय सांगतो? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार – भारतात दरवर्षी 6,516 महिला हुंडाबळी ठरतात. बलात्कारामुळे हत्या झालेल्यांपेक्षा 25% अधिक बळी हुंड्यामुळे जातात. 2022 मध्ये हुंड्याचे 13,641 गुन्हे दाखल झाले. 2022 अखेरपर्यंत न्यायालयात प्रलंबित असलेली 60,577 प्रकरणे नोंदली गेली. न्याय मिळतो का? न्याय मिळण्यात प्रचंड विलंब होत असल्याचेही आकडे सांगतात. 2022 मध्ये सुनावणी झालेल्या 3,689 प्रकरणांपैकी केवळ 33% आरोपींना शिक्षा झाली. हुंडा छळाच्या 6,161 प्रकरणांपैकी फक्त 99 प्रकरणांमध्ये शिक्षा झाली. म्हणजेच निक्की भाटी सारख्या प्रकरणांना एका वर्षात न्याय मिळण्याची शक्यता 2% पेक्षाही कमी आहे. हुंड्याची भयानक मानसिकता 2010 च्या एका अभ्यासात उघड झालं की – लग्नाचा खर्च वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाच्या तुलनेत दीडपट केला जातो. 24% कुटुंबे अजूनही हुंडा स्वरूपात टीव्ही, फ्रीज, कार किंवा मोटरसायकल देतात. 29% लोक हुंडा न मिळाल्यास महिलेला मारहाण करणे ‘सामान्य’ मानतात.  हुंडा घेणं-देणं हे कायद्याने गुन्हा आहे, पण आकडे सांगतात की समाज अजूनही या कुप्रथेतून बाहेर आलेला नाही. प्रश्न असा आहे की, “कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव…?”

कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव..?

फसवणूक, अत्याचार, बलात्कार… या कारणांमुळे अनेक तरुणींनी आपलं

आयुष्य संपवलं किंवा त्यांची हत्या झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो.

पण आता गुन्हे विभागाने दिलेला धक्कादायक रिपोर्ट वेगळंच वास्तव समोर आणतो आहे.

बलात्कारामुळे नव्हे तर हुंडा आणि सासरी होणाऱ्या जाचामुळे अनेक मुलींचे बळी गेले आहेत.

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण अजून ताजं असतानाच,

ग्रेटर नोएडा येथे 28 वर्षीय निक्की भाटी हिची पती व सासरच्यांनी निर्दयी हत्या केली.

हुंड्याच्या कारणावरून तिला मारहाण करून पेटवून दिल्याची भीषण घटना देशाला हादरवून गेली आहे.

NCRB चा रिपोर्ट काय सांगतो?

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार –

  • भारतात दरवर्षी 6,516 महिला हुंडाबळी ठरतात.

  • बलात्कारामुळे हत्या झालेल्यांपेक्षा 25% अधिक बळी हुंड्यामुळे जातात.

  • 2022 मध्ये हुंड्याचे 13,641 गुन्हे दाखल झाले.

  • 2022 अखेरपर्यंत न्यायालयात प्रलंबित असलेली 60,577 प्रकरणे नोंदली गेली.

न्याय मिळतो का?

न्याय मिळण्यात प्रचंड विलंब होत असल्याचेही आकडे सांगतात.

  • 2022 मध्ये सुनावणी झालेल्या 3,689 प्रकरणांपैकी केवळ 33% आरोपींना शिक्षा झाली.

  • हुंडा छळाच्या 6,161 प्रकरणांपैकी फक्त 99 प्रकरणांमध्ये शिक्षा झाली.

  • म्हणजेच निक्की भाटी सारख्या प्रकरणांना एका वर्षात न्याय मिळण्याची शक्यता 2% पेक्षाही कमी आहे.

हुंड्याची भयानक मानसिकता

2010 च्या एका अभ्यासात उघड झालं की –

  • लग्नाचा खर्च वधूच्या कुटुंबाकडून वराच्या कुटुंबाच्या तुलनेत दीडपट केला जातो.

  • 24% कुटुंबे अजूनही हुंडा स्वरूपात टीव्ही, फ्रीज, कार किंवा मोटरसायकल देतात.

  • 29% लोक हुंडा न मिळाल्यास महिलेला मारहाण करणे ‘सामान्य’ मानतात.

 हुंडा घेणं-देणं हे कायद्याने गुन्हा आहे, पण आकडे सांगतात की समाज अजूनही या कुप्रथेतून बाहेर आलेला नाही.

प्रश्न असा आहे की, “कुटुंबाची इज्जत महत्त्वाची की लेकीचा जीव…?”

Read also :https://ajinkyabharat.com/governance-overcrowded-shetkayanchaya-patheshi/