अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व आदिवासी बहुल भाग असलेले गट ग्राम पंचायत रामापूर
येथे शासनाने गेल्या २५ ते ३० वर्षा पासून लाखो रुपये खर्च करून तलाठी निवास कार्यालय बांधले आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
मात्र तिथे कुठल्याही सोय सुविधा आज पर्यंत उपलब्ध करून दिल्या नसल्याने ते तलाठी निवास कार्यालय धूळख्यात पडलेले असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे त्या तलाठी निवास कार्यालयाच्या आजूबाजूला गावातीलच काही लोकांनी इंधन, काळी कचरा, गुरेढोरे,
बकऱ्या बांधण्यासाठी खुठे रोवून अतिक्रमण केले आहे. या बाबत रामापूरचे तलाठी व गावातूनच या
अतिक्रमण बद्दल लेखी तक्रार सुध्दा करण्यात आली होती. या बाबत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करण्यात आले होत.
त्या प्रमाणे ग्राम पंचायत यांनी दखल घेऊन संबंधित अतिक्रमण धारक यांना ग्राम पंचायत मार्फत नोटीसेस बजावून
आपआपले अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढून मोकळे करावे अन्यथा आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात
येईल याची नोंद घ्यावी असे कळविले होते. त्या वरून अतिक्रमण धारक यांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून मोकळे केले होते.
मात्र या तलाठी निवास कार्यालयात लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टेबल, खुर्च्या, कोणत्याही सोय सुविधा
उपलब्ध नसल्याने तलाठी यांना कार्यालय उघडून हजर राहणे बाबत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
म्हणूनच येथे तलाठी हजर राहत नसल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळेच तेथे वेळोवेळी अतिक्रमण सुध्दा होत आहे.
तरी शासनाने ताबडतोब दखल घेऊन रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय समोरील अतिक्रमण ग्राम पंचायत यांना
काढून मोकळे करण्याचे आदेश द्यावे.व तेथे तात्काळ सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.
म्हणजे जेणे करून तेथे तलाठी हे कार्यालय उघडून तेथे रुजू होतील व शेतकऱ्यांना,शेतमुजरांना,
शाळकरी विद्यार्थ्यांना लागणारे महत्वाचे कागदपत्र हे अकोटला न
जाता गावातिलच तलाठी निवास कार्यालयात उपलब्ध करून देतील अशी मागणी होत आहे.
रामापूर येथील तलाठी निवास कार्यालयाकडे शासनाचे दुर्लक्ष,सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी.
Read Also : https://ajinkyabharat.com/udya-chief-minister-devendra-fadnavis-o-akola-dahyawar/