रामापुर,बोर्डी परिसरात हरभरा सोंगणी व काढनीला सुरुवात

रामापुर,बोर्डी परिसरात हरभरा सोंगणी व काढनीला सुरुवात

एकरी 10 क्विंटल आवरेज,शेतकऱ्यांमध्ये आनंद

अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,हा

परिसर बागायती म्हणून प्रसिद्ध आहे.या परिसरात सध्या हरभरा सोंगणी व काढणीला सुरुवात झाली आहे.

Related News

ज्याकी ९२१८,राजविजय,विजया,या हरभरा बियाण्याची शेतकऱ्यांनी ऑक्टोंबर महिन्यात पेरणी केली होती.

तरी गेल्या दोन-तीन दिवसापासून या परिसरात हरभरा सोंगनि व काढणी सुरू असून यामधून शेतकऱ्यांना

एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पन्न मिळत आहे.यावर्षी प्रथमच हरभऱ्याला,५६०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे चांगला

भाव मिळत असून चांगले उत्पन्न मिळत झाले आहे.हरभऱ्याच्या कुटाराला सुद्धा ४०० ते ४५० रुपये पोत्याप्रमाणे

भाव मिळत असून मोठ्या प्रमाणात कुटाराला मागणी होत आहे.हरभरा ४ किलो पोत्याप्रमाणे ट्रॅक्टरने हळंबाने काढने सुरू आहे.

यावर्षी हरभरा पिकात झालेल्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद झाला आहे.
प्रतिक्रिया
मी ६ एकर जॅकी ९२१८ या जातीचा हरभरा पेरला होता.

मला यामधून एकरी नऊ क्विंटल उत्पन्न झाले असून ५७०० प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

रितेश अरुण चामलाटे

शेतकरी रामापूर.

Click here for more updates :https://ajinkyabharat.com/prithvivar-mothy-purch-crisis-doomsde-masa-samudra-kinari-alayane-bheethe-environment/

Related News