रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आल्यास जीवे मारण्याची धमकी; २७ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
पुणे – रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ रिकाम्या हाताने आल्यास जीवे मारून टाकू, अशी धमकी पतीकडून
मिळाल्यानंतर २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आणखी एका हुंडाबळीची नोंद झाली आहे.
मृत विवाहितेचे नाव स्नेहा विशाल शेंडगे (वय २७ ) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, पतीकडून वारंवार छळ व धमक्या दिल्या जात होत्या.
रक्षाबंधनाला भावाकडून अपेक्षित भेटवस्तू न आल्यामुळे झालेल्या वादात “रिकाम्या हाताने आला तर जीवे मारून टाकीन” अशी धमकी देण्यात आली.
मानसिक तणावाखाली स्नेहाने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून भारती
विद्यापीठ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून
पोलिसांनी पतीसह संबंधितांविरुद्ध मामला नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.