रक्षाबंधनाआधी गिफ्ट! ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलै हप्ता मिळणार; 2984 कोटींचा निधी वर्ग

रक्षाबंधनाआधी गिफ्ट! ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलै हप्ता मिळणार; 2984 कोटींचा निधी वर्ग

मुंबई (प्रतिनिधी)राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजने’च्या जुलै महिन्याच्या

हप्त्यासाठी 2,984 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे.

हा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

30 जुलै रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, रक्षाबंधनाच्या आधी बहिणींना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

ऑगस्टमध्ये डबल हप्ता मिळणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देत,

सरकारने स्पष्ट केले आहे की यावेळी फक्त जुलै महिन्याचा हप्ता दिला जाईल.

राज्य सरकारने एकूण 28,290 कोटींची तरतूद केली असून, त्यातील 2,984 कोटी यंदाच्या हप्त्यासाठी वापरले जात आहेत.

लाडक्या बहिणींसाठी ही योजना महायुती सरकारची महत्वाकांक्षा ठरत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/dhaba-te-lohgad-rastayche-tamblele-kama-quarted-suru-karna-janata-party/