राज्यातील ग्रंथालयांना लाखाचा मानाचा पुरस्कार; कार्यकर्त्यांनाही सन्मान

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार"

राज्यातील वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधण्यासाठी

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत उत्कृष्ट ग्रंथालय

तसेच कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून,

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार”

हा राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील “अ”, “ब”, “क” व “ड”

वर्गातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिला जातो.

या पुरस्कारात अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपयांची रोख रक्कम,

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट प्रदान केली जाणार आहे.

तसेच भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या नावे

“ग्रंथमित्र पुरस्कार” अंतर्गत राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व

एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा मानाचा पुरस्कार दिला जाईल.

त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक महसुली विभागातून एक कार्यकर्ता

व एक सेवक यांची निवड करून प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुरस्कार,

सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.

सन २०२४-२५ या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व

सेवक यांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह तीन

प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दिनांक ३० सप्टेंबरपूर्वी सादर करावेत,

असे आवाहन प्रादेशिक ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/district-pudil-three-day-paus-havaman-tyacha-system/