राजेश्वर सेतुला कठडे बसवा,बचपन बचाव संघटनेचे मोर्णा पात्रात आंदोलन

आंदोलन

आंदोलनाला जमात ए इस्लामे हिंद चा पाठींबा

अकोला: आज सकाळी 11 वाजता बचपन बचाव संघटने च्या वतीने

मोर्ना नदी पत्रात उतरून आंदोलन करण्यात आले.

Related News

यावेळी काही दिवसांपूर्वी मोर्णा नदीपात्रात वाहून गेलेल्या

4 वर्षाच्या जय सचिन बोचे या चिमुकल्याला श्रद्धांजली देखील अर्पित कऱण्यात आली.

तसेच रस्ता रोखो आंदोलन करीत ह्या पुलाला कठडे बसवा

अन्यथा हा पूल बंद करून मोठा पूल बांधा अशी मागणी करण्यात आली,

ह्या आंदोलनाची दखल न घेतल्यास खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी

ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

तसेच बचपन बचाव संघटनेच्या आंदोलनाला जमात ए इस्लामी हिंद च्या वतीने

पाठींबा देत लवकरात लवकर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत

व पुलाला कठडे बसवण्याची मागणी केली. बचपन बचाओ संघटनेचे राजेश गावंडे

यांनी बोचे कुटुंबीयांना आर्थिक मदत केली आहे, यावेळी गणेश सपकाळ,

संतोष सपकाळ, कृष्णा गवई, अमोल अढाऊ, संतोष भोसले, रावण सपकाळ,

यासह बचपन बचाओ संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/presence-of-raj-thackeray-in-bharat-jadhavs-play-4444-vya-laboratory/

Related News