बंगळुरू – सेंट्रल झोनने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत साऊथ झोनवर 6 विकेट्सनी मात करत तब्बल 11 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. 65 धावांचे साधे लक्ष्य गाठताना सेंट्रल झोनच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. अक्षय वाडकर (नाबाद 19, 52 चेंडू) आणि यश राठोड (नाबाद 13, 16 चेंडू) यांनी क्रीजवर स्थिरता राखली, आणि 20.3 षटकांत 4 गडी गमावून टीमने विजय मिळवला.सेंट्रल झोनच्या कर्णधार रजत पाटीदारसाठी हे वर्ष अत्यंत संस्मरणीय ठरले आहे. त्यांनी याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते, आणि आता दुलीप ट्रॉफीत आपला नेतृत्वाचा ठसा उमटवला. पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनमध्ये पाटीदार म्हणाले,
“प्रत्येक कर्णधाराला ट्रॉफी जिंकणं महत्त्वाचं असतं, पण आमच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त जिद्द दाखवली. डॅनिश आणि यशसाठी मला विशेष आनंद आहे, कारण त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी केली.”सेंट्रल झोनने आतापर्यंत दुलीप ट्रॉफीत सातवे विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद वेस्ट झोनने पटकावले आहेत, 19 वेळा, तर नॉर्थ झोन 18 वेळा विजेता ठरला आहे.या विजयासोबतच, रजत पाटीदारची वर्षभराची कामगिरी खास ठरली असून, त्यांनी एकदोन नव्हे तर दोन प्रमुख विजेतेपदे मिळवून आपला क्रिकेट करिअर उज्वल केला आहे.
Rajat Patidar ने सेंट्रल झोनला 11 वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी जिंकवून दिली

15
Sep