“राज-उद्धव युतीवर स्मिता ठाकरेची पहिली प्रतिक्रिया

साहेब असते तर आनंदित झाले असते

मुंबई : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुटुंबातील सूनबाई स्मिता ठाकरे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होणाऱ्या संभाव्य युतीवर आपले मत व्यक्त केले आहे.स्मिता ठाकरे मुक्ती फाउंडेशनच्या वतीने जुहू येथील झोपडपट्टीतील मुलांना अन्न आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी शाळेत गेल्या होत्या. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले, “आओ भूक मिटाओ मी हे अभियान सुरू केले आहे. आमच्या आई-वडिलांचे संस्कार आहेत की जे काही मदत करायची आहे ते करावे. समाजसेवाची भावना प्रत्येक तरुणामध्ये असावी.”राजकारणात सहभागी होण्याबाबत स्मिता ठाकरे म्हणाल्या, “आत्तापर्यंत माझा राजकीय प्रवास सुरू झालेला नाही. मी कुठल्याही पक्षात सहभागी नाही. साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच आज मुक्ती फाउंडेशन स्थापन करू शकलो. माझी ओळख समाजसेविका आणि फिल्म मेकर म्हणून आहे. ठाकरे आडनाव असल्यामुळे मला राजकारणात जायचे आहे असे कुठे लिहिलेले नाही.”उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत विचारले असता स्मिता ठाकरे म्हणाल्या, “दोघेजण एकत्र आलेत ही कुटुंबासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पण जर साहेब असते तर त्यांना याचा खूप आनंद झाला असता. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, त्यामुळे युतीमुळे काय परिणाम होतील, हे मी सांगू शकत नाही.”स्मिता ठाकरेच्या या विधानामुळे ठाकरे कुटुंबाच्या सदस्यांच्या भावनिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर प्रकाश पडतो.

read also : https://ajinkyabharat.com/hivarkhed-yethil-journalist-dhumkavanya-contractor-journalist-bandhani-requests-requested/