पावसाळ्यात घ्या डोळ्यांची काळजी, ‘या’ संसर्गाचा धोका

कडक

कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की आनंदाचे वातावरण पसरते.

घाम, उकाडा यापासून सुटका होते.

Related News

पावसाने वातावरणातील गरमी कमी होते.

अर्थात, पावसाची विविध रूपे या काळात पाहायला मिळतात.

पावसाळ्यात थोडीफ्फार काळजी आपण घेतच असतो.

पण, त्यातही डोळ्यांची काळजी घेण्याची विशेष गरज असते.

विविध प्रकारचे संसर्ग पावसाळ्यात होऊ शकतात.

विशेषतः लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते.

कारण ते सतत बाहेर राहात असल्याने संसर्ग होण्याचा धोका त्यांना अधिक असतो.

जूनच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत असलेल्या पावसाने उमसल्यासारखे होते.

जुलैमध्ये पावसाचा जास्त जोर असतो.

माणसाच्या शरीरातील नाजूक अवयव असणाऱ्या डोळ्यांवर बाहेरील वातावरणाचे परिणाम होत असतात.

या काळात प्रदूषणही अधिक असते.

अशा वातावरणात, धावपळीच्या जीवनात लोक डोळ्यांची काळजी घेण्याविषयी तितकेच सतर्क नसतात.

पावसाळ्यात डोळ्यांना काही सर्वसाधारण संसर्ग दिसून येतात.

डोळे येणे: कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येणे.

यामध्ये डोळ्याच्या आतील पांढरा भाग तसेच पापणीचा आतील भाग याला कंटक्टीवा असे म्हटले जाते.

डोळ्याच्या या भागात जळजळ होणे, लाल होणे,

सूज येणे यालाच आपण डोळा येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस असे म्हणतो.

त्याचे मुख्य कारण आहे संसर्ग आणि अॅलर्जी.

पावसाळ्यात जो विषाणूजन्य ताप येतो त्याचा परिणाम म्हणूनही

डोळे येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस होतो.

पावसाळ्यात हाच त्रास अधिक प्रमाणात होतो.

मुख्य म्हणजे कन्जक्टिव्हायटीसचा संसर्गही मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होतो.

रांजणवाडी आय स्टाई म्हणजे रांजणवाडी.

पापण्यांच्या आसपास लाल होऊन येर्णाया सुजेला रांजणवाडी म्हणतात.

रांजणवाडीत पू होतो आणि ती फुटून पू बाहेर येऊन

त्याचा पूर्ण निचरा झाल्याशिवाय ती बरी होत नाही.

अस्वच्छ हातांनी डोळे चोळल्यास रांजणवाडी होऊ शकते

किंवा जीवाणूंमुळेही ती होते.

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात रांजणवाडी हा

आजार सर्वसाधारणपणे आढळतो.

Read also: https://ajinkyabharat.com/kalki-2898-ad-written-and-directed-by-nag-ashwin/

Related News