रेल्वे स्थानकावर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा

रेल्वे स्थानकावर जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन साजरा

बुलढाणा – अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट व जिल्हा महिला बाल विकास विभाग बुलढाणा,

यांच्या वतीने जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त शेगाव रेल्वे स्थानकावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे

प्रमुख अतिथी:- मा. श्री. मोहन देशपांडे सर, स्टेशन मॅनेजर रेल्वे स्टेशन शेगाव

अॅड. वर्षा पालकर मॅडम सदस्य बालकल्याण समिती बुलढाणा

मा.श्री. रामेश्वर वसु

तालुका संरक्षण अधिकारी बुलढाणा

मा.शेख शोएब जिल्हा समन्वयक चाईल्ड लाईन 1098 बुलढाणा

प्रमुख पाहुणे :- मा. श्री. एस. एस. हरणे सर निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल (RPF) रेल्वे स्टेशन शेगाव

मा. श्री. विवेकानंद राळेभात सर सहाय्यक पोलीस निरीक्षक (GRP) रेल्वे स्टेशन शेगाव

मा. श्री. नरेंद्र कराळे सर मुख्य तिकीट निरीक्षक रेल्वे स्टेशन शेगाव

मा.पाटील मॅडम सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर रेल्वे स्टेशन शेगाव

मा.धर्माधिकारी सर ट्राफिक इन्स्पेक्टर रेल्वे स्टेशन शेगाव आदी उपस्थित होते.

अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट ही जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन या राष्ट्रीय नेटवर्कशी संलग्न भागीदार संस्था म्हणून बुलढाणा

जिल्ह्यामध्ये मुलांचे संरक्षण,सुटका आणि न्याय सूनिश्चिततेसाठी काम करत आहे.

हे देशातील 250 हून अधिक संस्थांचे बालहक्क क्षेत्रातील सर्वात मोठे नेटवर्क आहे.

बुलढाणा जिल्ह्यात अस्मिता संस्थेने बालमजुरी, बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार व तस्करी

विरोधात प्रभावी कार्य केले असून गेल्या वर्षभरात 670 मुलांची सुटका करण्यात आली आहे.

अस्मिता संस्थेने 15 जुलैपासून आरपीएफ च्या सहकार्याने रेल्वे स्थानकांवर बाल तस्करी विरोधात जनजागृती मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत प्रवासी,

विक्रेते,,रेल्वे कर्मचारी,दुकानदार, पोर्ट्स,रेल्वे स्टेशन कर्मचारी, टीटीई, वेंडर, कुली

आदी यांना बाल तस्करीची लक्षणे ओळखणे व तत्काळ तक्रार नोंदवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांनी मानवी तस्करी म्हणजे काय? ती कशी आणि का घडते?

ती रोखण्यासाठी उपाय काय असू शकतात? बाल तस्करी रोखण्यासाठी पोलीस रेल्वे बालकल्याण संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे कार्य

करणे नितांत गरजेचे आहे यासारख्या विषयांवर आपले विचार मांडले. जागरूकता वाढवण्यासाठी लोकांना

हँडबिल वाटप करण्यात आले तसेच रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर,डब्यांवर जनजागृती पर पोस्टर्स व बॅनर्स मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले.

रेल्वे स्टेशनवर ऑडिओ क्लिप सुद्धा वाजविण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती खरात यांनी केले,आभार हर्षदीप वानखडे कम्युनिटी सोशल वर्कर यांनी मानले.

या प्रसंगी अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटच्या अध्यक्ष संगीता गायकवाड, जिल्हा समन्वयक योगेश डांगे,

तालुका समन्वयक हर्षदीप वानखडे, रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/3-august-rosie-shaleya-nutrition-diet-worker-sangatneche-chikhalate-session/