राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ

राहुल गांधी

विचार करून निर्णय घेणार- राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीत एनडीए’ला बहुमत मिळाले,

Related News

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

दरम्यान, शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडल्या.

लोकसभा निवडणुक निकालानंतर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत

राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राहुल गांधींच्या नावासाठी आग्रह धरला आहे.

त्यामुळे, संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधींची निवड होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी राहुल गांधी यांनी विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं,

यासाठी विनंती केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील राहुल गांधी यांना

पक्ष सदस्यांच्या भावना मान्य करावे लागतील,

असे म्हटले आहे.

तर, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत

संसदेतील विरोधीपक्षनेतेपदासाठी राहुल गांधींच्याच नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचं

काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल राव यांनीही सांगितलं आहे.

तर, काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून राहुल गांधींनी निवड झाल्याचंही जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे, राहुल गांधींच विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसू शकतात हे जवळपास निश्चित झालं आहे.

मणिकम टागोर यांनी राहुल गांधी यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात काँग्रेसचे नेते बनण्याचे आवाहन केलेय.

मणिकम टागोर हे तामिळनाडूतील विरुधुनगरमधून विजयी झाले आहेत.

ते म्हणतात की, ‘मी माझे नेते राहुल गांधी यांच्या नावाने मते मागितली.

ते लोकसभेतील काँग्रेसचे नेते असावेत, असे मला वाटते.

मला आशा आहे की काँग्रेसचे निवडून आलेले खासदारही असाच विचार करतील.

बैठकीत के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, आता काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन सुरू झाले आहे.

हा CWC चा आत्मा आहे.

काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे.

संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत.

Related News