राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

काँग्रेस

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची

शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी

केलेल्या वक्तव्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related News

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना

19 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले आहेत. कलम 204 अन्वये हे आदेश

देण्यात आले आहेत. राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडन मध्ये

एका भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात हा खटला

दाखल करण्यात आला होता. सात्यकी सावरकर यांनी दाखल तक्रार करण्यासाठी

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यायालयात धाव घेतली होती.

राहुल गांधी यांनी लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप आहे.

पुणे पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी

पुणे सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती.

त्यानंतर न्यायालयाने पुण्यातील विश्रामबाग पोलिसांना या प्रकरणाचा

तपास करण्याचे आदेश दिले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/mns-president-raj-thackerays-biography-ulagadanar-each-number/

Related News