विधानसभा निवडणुकीसाठी कॉँग्रेसचा मेगा प्लॅन
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे.
लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर काँग्रेस आता
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
महाराष्ट्रात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. राज्यात जास्तीत
जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने मेगा प्लान तयार
केला आहे. या प्लाननुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी
हे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत तळ ठोकणार आहेत. दोन्ही
नेते महाराष्ट्रावर सर्वाधिक फोकस करणार असून राज्यात जास्तीत जास्त
सभा घेणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांचंही महाराष्ट्रावर
लक्ष असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष असणार आहे. राहुल गांधी
आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका उडवून देण्यात येणार आहे.
राज्यात या दोन्ही नेत्यांच्या 15 ते 20 सभा होणार आहेत. दोन्ही नेते प्रत्येक
विभागात सभा घेणार आहेत. सोबतच काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या देखील
सभा होणार आहेत. सभांच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांनी केंद्राला आज
सविस्तर माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेस नेते आणि
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या आजच्या बैठकीची
माहिती दिली. आज वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी राज्यातील परिस्थिती
बाबतची चर्चा करून सर्व माहिती दिली. आघाडी संदर्भातही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा
करण्यात आली आहे. आता 23 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे जिल्ह्याची बैठक होणार
आहे. या बैठकीत आम्ही जिल्हानिहाय आढावा घेणार आहोत, अशी माहिती
विजय वडेट्टीवार यांनी दिली.
Read also: https://ajinkyabharat.com/pathanatytun-drug-free-public-awareness-in-yavatmal-city/