राहुल गांधींचा आरोप: “मोदींनी अर्थव्यवस्थेचा खून केला”

राहुल गांधींचा आरोप: "मोदींनी अर्थव्यवस्थेचा खून केला"

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला असून,

त्यांनी म्हटलं आहे की भारतीय अर्थव्यवस्था मृत झाली आहे. मोदींनी अर्थव्यवस्थेचा खून केला आहे.”

त्यांनी लघु उद्योगांचे पतन, बेरोजगारीचा विस्फोट, आणि शेतकरी संकट यासाठी थेट केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.

राहुल गांधी यांनी मांडलेले पाच ठळक मुद्दे:

  1. अदानी-मोदी भागीदारी – सरकार केवळ काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप.

  2. नोटाबंदी आणि GST – या निर्णयांमुळे लघु उद्योग आणि असंघटित क्षेत्राचे नुकसान.

  3. ‘अ‍ॅसेम्बल इन इंडिया’चे अपयश – ‘मेक इन इंडिया’चा अपेक्षित परिणाम न होणं.

  4. MSME क्षेत्र कोसळले – धोरणांमुळे छोटे-मोठे उद्योग अडचणीत.

  5. शेतकरी संकट – एमएसपी अभाव, कर्जमाफीची फसवणूक आणि चुकीचे कृषी कायदे.

राहुल गांधी म्हणाले की, “मोदींनी भारताच्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे, कारण आता नोकऱ्याच उरल्या नाहीत.”

राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे खळबळ माजली असून, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

रोजगार, MSME आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/dr-abhay-patil-yancha-state-sannyas/