साऊथ सिनेसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर रश्मिकाच्या काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांमध्ये आणि मीडिया मध्ये गुप्त साखरपुडा झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
रश्मिकाच्या अंगठीने खळबळ उडवलीसोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले हे फोटो दुबई विमानतळावरचे असून, रश्मिका साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) 2025 साठी पोहोचली होती. पांढऱ्या रंगाचा ओव्हरसाईझ टीशर्ट आणि निळ्या रंगाच्या जिन्समध्ये कॅजुअल लूकमध्ये रश्मिका दिसली. मात्र, तिच्या बोटातील चमकदार डायमंड अंगठी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या अंगठीच्या प्रकाशात सर्वांचे लक्ष तिच्या रिलेशनशी जोडले गेले. चर्चा अशी आहेत की, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा गुपचूप साखरपुडा झाला आहे. तरीही, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
रश्मिका-विजयच्या अफेअरची साखळीगेल्या काही वर्षांपासून रश्मिका आणि विजय एकमेकांशी डेट करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पार्टी, लंचसारख्या विविध ठिकाणी एकत्र वेळ घालवताना दोघांना अनेकदा स्पॉट करण्यात आले. परंतु, दोघांनी कधीही त्यांच्या रिलेशनची अधिकृत कबुली दिलेली नाही.
कामाच्या बाबतीत पाहिले तर, विजय देवरकोंडा ‘किंगडम’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला आला होता आणि सध्या त्याचा आगामी प्रोजेक्ट चर्चेत आहे. तर रश्मिका मंदाना ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘थामा’ सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या हे व्हायरल फोटो आणि साखरपुडा चर्चेच्या भोवऱ्यात असल्यामुळे चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. अधिकृत घोषणा न झाल्यामुळे प्रत्येकजण या कथित लग्नाच्या सत्यतेसाठी उत्सुक आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/lalbagcha-rajchaya-immersion-obstruction/