कुरेशी समाजावरील अन्याय दूर करावा

कुरेशी समाजावरील अन्याय दूर करावा

बैल,म्हैस खरेदी- विक्री संदर्भात शासनाने नियमावली करावी अन्यथा कुरेशी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन

कुरेशी समाजाचे अकोट तहसीलदार यांना निवेदन

विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधी

अकोट : अकोट शहरातील कुरेशी समाज कृषी जनावरांच्या संलग्नित बैल,म्हैस यांच्या

खरेदी विक्री संदर्भात पारंपारिक पद्धतीने अनेक वर्षापासून व्यवसाय करीत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील दाखले, वाहतूक परवाने, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र अशा

कायदेशीर बाबींचे पालन महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार नियमितपणे केला जाते.

मात्र काही संघटना व व्यक्ती कूरेशी समाजावर अतिरेकी पद्धतीने अन्याय करीत आहेत.

समाज बांधवांना रोडवर अडवून अश्लील शिवीगाळ व मारहाण केली जाते.

असे अनेक गंभीर प्रकार आमच्या समाजावर घडत आहेत.

हे अतिशय निंदनीय असल्यामुळे आमच्या समाजावर होणारा अन्याय आपण दूर करावा.

अन्याय करणाऱ्या संघटनांवर कायदेशीर कार्यवाही करून आमच्या कुरेशी समाजाला न्याय मिळवून द्यावा.

अशी मागणी कुरेशी समाजाच्या वतीने अकोट तहसीलदार यांच्यामार्फत अकोला जिल्हाधिकारी यांना एका निवेदनातून केली आहे.

सदरचे निवेदन अब्दुल नाझीर अब्दुल करीम यांच्या मार्गदर्शनात कुरेशी समाजातील नागरिकांच्या वतीने देण्यात आले.

Read Also :  https://ajinkyabharat.com/chondhi-yethil-gramsthani-gram-panchayat-office/