कुरणखेडजवळ बसचा अपघात; वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाचे तत्पर कार्य

चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

कुरणखेडजवळ बसचा अपघात; वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकाचे तत्पर कार्य

कुरणखेड – राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून,

प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

आज (गुरुवार) संध्याकाळी सातच्या सुमारास अमरावतीहून

शेगावच्या दिशेने जाणारी अमरावती विभागाची एस.टी. बस (क्र. एमएच 14-7574) कुरणखेड

टोल नाका परिसरात अपघातग्रस्त झाली.

बसमध्ये सुमारे 24 प्रवासी प्रवास करत होते.

समोरील वाहनाने अचानक ओव्हरटेक केल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि

बस थेट सुरक्षा भिंतीवर धडकली. यात बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले

तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला.

घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील

वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे कार्यकर्ते योगेश विजयकर,

विजय माल्टे आणि गोलू डवरे घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तत्परतेने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

सुदैवाने प्रवाशांना जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना देण्यात आली असून,

एसटी महामंडळाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांमुळे अशा घटना

वारंवार घडत असल्याने नागरिकांतून रोष व्यक्त होत आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/dadi-akhher-turungabaher-jamsandekar-murder-case-arun-gavila-supreme-cortacha-jamin/