कुरणखेड तंटामुक्ती अध्यक्षपदी जशीमुद्दीन खतीब यांची अविरोध निवड

कुरणखेड तंटामुक्ती अध्यक्षपदी जशीमुद्दीन खतीब यांची अविरोध निवड

कुरणखेड – कुरणखेड ग्रामपंचायत कार्यालयात 17 ऑगस्ट रोजी झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या

निवडणुकीत जशीमुद्दीन खतीब यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत दुसरे उमेदवार नजर अली यांनी संमती दर्शविल्याने

निवडणूक न होता शांततेत निर्णय झाला.

तंटामुक्त समितीची भूमिका

2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या माध्यमातून गावातील वाद, भांडणे न्यायालयात न नेता गावातच सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.

दरवर्षी 15 ऑगस्टनिमित्त ही निवडणूक घेतली जाते. यंदा मात्र निवडणूक 17 ऑगस्ट रोजी पार पडली.

गावातील एकतेचा आदर्श

यंदा निवडणुकीत कोणताही वाद न होता, तंटामुक्त निवडणुकीने गावात एकतेचा आदर्श निर्माण केला आहे.

ग्रामस्थांनी एका युवा चेहऱ्याला संधी देत गावातील सौहार्द वाढविण्याचा संदेश दिला आहे.

 निवडणुकीचा कारभार ग्रामविकास अधिकारी रवी काटे यांच्या देखरेखीखाली पार पडला.

 या प्रसंगी ग्रामसेवक रवी काटे, प्रशांत पांडे, तसलीम बेग मिर्झा, सुशिल मोहोड, अमन महल्ले, मिलिंद मोहोड, सलीम मिर्झा, किरण उमाळे, विनोद आठवले

यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.

 गावकऱ्यांची अपेक्षा आहे की, “गावात कोणताही तंटा होणार नाही आणि सर्व वाद गावातच सौहार्दाने मिटवले जातील.”

Read also :https://ajinkyabharat.com/akolyatil-junya-cotton-marketmadhy-fierce-fire/