पातुर – आमदार डॉ. राहुल पाटील कॅम्पस कॉलेज अंतर्गत डॉ. वंदनाताई जगन्नाथराव ढोणे आयुर्वेद कॉलेज,
पातुर येथे दिनांक २६ ऑगस्ट रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश प्रसाद ठाकरे हे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात त्यांनी प्रतिपादन केले की –“आपला देश हा कायद्याने चालतो आणि चालत राहणार आहे.
प्रत्येक नागरिकाला कायद्याची माहिती असणे अत्यावश्यक आहे.”
शिबिरात ऍड .रूपाली राऊत (विधीज्ञ, पातुर) आणि ऍड .महेंद्र मृग (विधीज्ञ, पातुर)
यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून उपयुक्त माहिती दिली.
या कार्यक्रमाला उप प्राचार्य डॉ. अभय भुस्कडे, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. आशिष केचे,
डॉ. किरण इंगळे, प्रा. प्रशांत निकम, श्री. दिलीप बगाडे, श्री. शरद अवचार तसेच प्रथम व
द्वितीय वर्ष आयुर्वेद विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रमेश पोहरे व गणेश राठोड यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. शैलेंद्र पुंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत निकम यांनी केले.
Read also :https://ajinkyabharat.com/donald-trump-yanchaya-navya-threatened-to-threaten/