पुतिन यांचा ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का!

जगभरात तणावाचं वातावरण.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप सुरू असतानाच आता रशियाने थेट अमेरिकेवर लक्ष केंद्रित केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेकडून रशियावर युद्धविरामासाठी दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र रशियाने याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेलाच मोठं आव्हान दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया नाटो देशांच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच्या लढाऊ विमानांनी पोलंड आणि एस्टोनिया यांच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली होती. यानंतर आता रशियाच्या लढाऊ विमानांनी थेट अमेरिकेच्या एअर डिफेन्स क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे.

अलास्कामध्ये रशियाची घुसखोरी: अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाची दोन बॉम्ब वाहक विमानं टीयू-95 आणि दोन लढाऊ विमानं Su-35 यांनी अलास्काच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केली. यानंतर अमेरिकेच्या वायुदलाने तातडीने प्रत्युत्तर देत F-16 लढाऊ विमानांच्या मदतीने या विमानांना बाहेर काढले. अमेरिकन सैन्याने सांगितले की ही घटना एअर डिफेन्स क्षेत्रात घडली असून, हे क्षेत्र कोणत्याही देशाच्या थेट हवाई सीमेत नसते. मात्र अशा कृतींमुळे दोन्ही देशांमधील तणाव निश्चितच वाढला आहे.

नाटो देशांमध्ये तणाव: रशियाच्या या कारवाईमुळे नाटो देशांमध्ये दहशत आणि चिंता निर्माण झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत पोलंड, एस्टोनिया आणि आता अमेरिका या देशांच्या हवाई क्षेत्रात रशियाच्या विमानांनी घुसखोरी केल्याने नाटो देशांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. अमेरिकेने स्पष्ट केलं आहे की, “आमच्या हवाई क्षेत्रात पुन्हा एकही रशियन विमान घुसणार नाही.”

जगभरात खळबळ: रशियाच्या या हालचालींनंतर जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव वाढत असून, अनेक देश या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील नातेसंबंधांवरही या घटनांचा परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. रशियाच्या आक्रमक हालचालींमुळे अमेरिका आणि नाटो देश अलर्ट मोडवर गेले आहेत. युक्रेन युद्ध थांबण्याऐवजी आता संघर्षाचा परीघ वाढत चालल्याचं स्पष्ट दिसत आहे.

read also:https://ajinkyabharat.com/ganun-gya-fintech-apsche-benefits-aani-totte