पुतीन यांचा मोदींना फोन; ट्रम्पसोबतच्या चर्चेचा दिला आढावा
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली वेगवान झाल्या आहेत. अलास्का येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन (Vladimir Putin) आणि
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या भेटीनंतर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फोन करून चर्चेचा
सविस्तर आढावा दिला.
युद्ध संपवण्यासाठी भारताचा शांतीचा आग्रह
फोनवरील संभाषणात पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं की रशिया-युक्रेन संघर्षाचं समाधान शांतीपूर्ण मार्गानेच शोधलं पाहिजे. भारत रशियाच्या पाठीशी ठामपणे उभा असून सुरू असलेल्या
सर्व प्रयत्नांना भारत समर्थन देत आहे, असं त्यांनी सांगितलं.
द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा
मोदी आणि पुतीन यांच्यातील संवादात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य आणि व्यापारसंबंधांवर देखील चर्चा झाली. मोदींनी पुतीन यांच्या संवादाबद्दल आभार मानले आणि भारत-
रशिया संबंध अधिक मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली.
अमेरिकेच्या टॅरिफनंतर बैठक
विशेष म्हणजे, अलीकडेच अमेरिका यांनी भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लागू केलं आहे. त्यानंतर लगेचच ट्रम्प-पुतीन बैठक झाली आणि
त्यानंतर मोदी-पुतीन फोनवरील चर्चा झाली. त्यामुळे या संवादाला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
भारत-अमेरिका संबंध तणावपूर्ण
दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ लादल्यानंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये थोडासा तणाव निर्माण झाला आहे. 25-29 ऑगस्टदरम्यान नियोजित असलेली भारत-अमेरिका व्यापार
चर्चेची सहावी फेरी सध्या लांबणीवर गेली आहे. अमेरिकेचं शिष्टमंडळ भारतात येणार नसल्याचं स्पष्ट झालं असून नवी तारीख जाहीर केली जाईल. आतापर्यंत या करारावर पाच
फेऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/gst-improvement-petrol-dejhel-swast-honar-nahi/
